vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई प्रतिनिधी : सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहूल टंडन, हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसक, बीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा,इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते, जीएआयएल इंडिया लि.चे उपसंचालक मोहम्मद शफी अवान, वरिष्ठ व्यवस्थापक दिपक वाघ, रितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समुहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधनबचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे.

घरातही आपण गॅस, वीज वापर, योग्य पद्धतीने केला. इमारतींवर सौर पॅनल वापरले, सिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करू शकतो आणि शाश्वत विकास गाठू शकतो, असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

इलेक्ट्रिक ट्रक’ निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोरगरीबांना स्वस्तात घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी..

विशेष लेख : कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…