vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर स्पोर्ट्स हब” विहित वेळेत उभारणार कामचा दर्जा, गुणवत्ता राखावी- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर स्पोर्ट्स हब” विहित वेळेत उभारणार कामचा दर्जा, गुणवत्ता राखावी- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

            राज्य प्रतिनिधी:- नागपूर, मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतीगृह, अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे “नागपूर स्पोर्ट्स हब” उभारण्यात येत आहे. हे स्पोर्ट्स हब पूर्णत्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केले. त्याचबरोबर “नागपूर स्पोर्ट्स हब” ची उभारणी विहित वेळेत करावी, कामचा दर्जा, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही श्री. भरणे यांनी दिले.

  आज मंत्रालयात “नागपूर स्पोर्ट्स हब”उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, उपअभियंता प्रशांत शंकरपुरे, वास्तूविशारद नुपूर वैद्य, नम्रता शेट्टी उपस्थित होते.

   मंत्री श्री. भरणे म्हणाले की, नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अॅकेडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स फिजीयोथेरेपी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स इव्हेंट, स्पोर्ट्स कोचींग इत्यादी कोर्सेस सुरु करुन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करीयरची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विशेष इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स स्कूलची उभारणी करण्यात येत आहे. स्पोर्ट्स इन्फॉरमेशन सेंटर उभारुन नवोदित खेळाडूंना व पालकांना विविध खेळाची अद्ययावत माहिती, शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजना, विविध पुरस्कार, शासकीय व खाजगी क्षेत्रातील सेवेच्या संधी इत्यादीबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

मुंबईकरांच्या जिवाची किंमत ह्या सरकारच्या राजवटीत शून्य झाली आहे का? एक्स अकाउंट वर काय म्हणतात आदित्य ठाकरे युवा नेते आमदार

तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान**स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक*

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जुन्नर तालुक्यात संपन्न दीड हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील 65 कोतवाल व पोलीस पाटील “आपदा मित्र” प्रशिक्षणासाठी कोलाडकडे रवाना