vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमली पदार्थ विरोधी प्रबोधनासाठी स्पर्धेत सहभागासाठी 8 मार्च मुदत

अमली पदार्थ विरोधी प्रबोधनासाठी स्पर्धेत सहभागासाठी 8 मार्च मुदत

        सांगली, द प्रतिनिधी: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विरोधी वातावरण निर्मिती व प्रबोधनकामी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रफीत (व्हीडिओ), नादमधुर कविता (जिंगल-ऑडिओ) व डिजीटल पोस्टर्स असे तीन प्रकार असून त्यास एकूण 51 हजार रूपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 8 मार्च 2025 ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

   स्पर्धा प्रकारानुसार निकष पुढीलप्रमाणे – चित्रफीत – हा प्रकार प्रबोधनकामी उपयोगात आणण्याचा असल्याने यामध्ये वयाची मर्यादा अट नाही. व्हीडिओ हा ६० ते ९० सेकंदांपेक्षा अधिकच्या कालावधीचा नसावा. आणि एचडी क्वालिटीचा असावा. आवाजात सुस्पष्टता असावी. या प्रकारामधून आशयघन, प्रभावी, आकर्षक (catchy) व नेमके प्रबोधन करणारे संदेश जाणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्याही जात-धर्म-प्रांत व महापुरुष यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. व्हीडिओमधून भडक स्वरुपाचे प्रदर्शन अपेक्षित नाही. या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास त्यास सर्वस्वी संबंधित स्पर्धक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. चित्रफीत संहितेला संबंधित लेखकाची सहमती आवश्यक आहे. यामध्ये पहिला क्रमांक 15 हजार रूपये, दुसरा क्रमांक 10 हजार रूपये व तिसऱ्या क्रमांकास 5 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.   नादमधुर कविता (ऑडिओ जिंगल) – हा प्रकार प्रबोधनकामी उपयोगात आणण्याचे असल्याने यामध्ये वयाची मर्यादा अट नाही. ऑडिओ हा तीस सेकंदांपेक्षा अधिकच्या कालावधीचा नसावा. आवाजात सुस्पष्टता असावी. या प्रकारामधून आशयघन, प्रभावी, आकर्षक (catchy) व नेमके प्रबोधन करणारे संदेश जाणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्याही जात-धर्म-प्रांत यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यामधून भडक स्वरुपाचे प्रदर्शन अपेक्षित नाही. नादमधूर कविता (जिंगल-ऑडिओ) हे स्वनिर्मित असावेत. या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास त्यास सर्वस्वी संबंधित स्पर्धक जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. यामध्ये पहिला क्रमांक 5 हजार रूपये, दुसरा क्रमांक 3 हजार रूपये व तिसऱ्या क्रमांकास 2 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. डिजीटल पोस्टर्स – हा प्रकार प्रबोधनकामी उपयोगात आणण्याचा असल्याने यामध्ये वयाची मर्यादा अट नाही. त्यामधील Content हा एचडी क्वालिटीचा असावा. या प्रकारामधून आशयघन, प्रभावी, आकर्षक (catchy) व नेमके प्रबोधन करणारे संदेश जाणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्याही जात-धर्म-प्रांत व महापुरुष यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. डिजीटल पोस्टर्स मधून भडक स्वरुपाचे प्रदर्शन अपेक्षित नाही. डिजीटल पोस्टर्स हे स्वनिर्मित असावेत. या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास त्यास सर्वस्वी संबंधित स्पर्धक जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. यामध्ये पहिला क्रमांक 5 हजार रूपये, दुसरा क्रमांक 3 हजार रूपये व तिसऱ्या क्रमांकास 2 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.अटी व शर्ती – चित्रफित-व्हीडिओ, नादमधुर कविता (ऑडिओ जिंगल) व डिजीटल पोस्टर्स अशा तीन प्रकारांबाबत सॉफ्ट कॉपी स्वरूपात (ऑडिओ, व्हीडिओ आणि पीडीएफ) गटस्तरावर गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालयास आणि जिल्हास्तरावर प्रशासन अधिकारी, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या कार्यालयास दिनांक 8 मार्च 2025 अखेर जमा करावे. गट स्तर व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्तरावरील संबंधित समिती अध्यक्षांनी तीन क्रमांक काढून जिल्हास्तरावर विहित मुदतीत सादर करण्याचे आहेत. जिल्हा स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षिसे दिली जातील व उर्वरि

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन,पत्रकार संरक्षण कायदा व ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदशन; पीसीएम जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची माहिती…