vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रविवार दि.९ ते ११ मार्च रोजी दररोज सायंकाळी साडेसहा ते १० या वेळात तापडीया नाट्यगृह येथे दुर्मिळ वाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. या दुर्मिळ वाद्य महोत्सवाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. या महोत्सवात तीन दिवसात धार्मिक वाद्ये, निसर्गातील वाद्यांवर व दुर्मिळ पारंपारिक वाद्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केले आहे.
०००००

संबंधित पोस्ट

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

रामनवमीसाठी अयोध्या सज्ज..

vishwatmaklokswamivarta

मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ स्पर्धा

शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत– आमदार संजय खोडके संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta