vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ठाणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न..

ठाणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न..

ठाणे, प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि.8 मार्च 2025 रोजी श्री मावळी मंडळ हायस्कूल, धोबी आळी, चरई, ठाणे (पश्चिम) येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार संजय केळकर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, माजी नगरसेवक संजय वाघुले, आसरा फाउंडेशनचे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत, मित्र मेळा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर संगपाळ, श्री मावळी मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर हे उपस्थित होते.“कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र” या ध्येयाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती घेण्यात आल्या. याशिवाय, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा आणि मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची (PMEGP, CMEGP, मुद्रा लोन, SEDD मनी योजना) माहिती तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

मित्र मेळा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर संगपाळ यांनी आभार प्रदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश काळे यांनी केले.00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत…व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बबनसोडे

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षणअनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबिर

माजी सैनिकांसाठी भरती मेळावा