vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांच्या प्रस्तावासाठी 11 एप्रिल मुदत…

सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांच्या प्रस्तावासाठी 11 एप्रिल मुदत…

        सांगली, प्रतिनिधी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता बारावी) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडु विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअन्वये संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी खेळाडुंचे परिपूर्ण क्रीडागुण सवलतीचे प्रस्ताव विहित नमुन्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावयाचे आहेत. यासाठी दि. 11 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जातील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

   सन 2024-25 या वर्षातील सांगली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयाचे ग्रेसगुणचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावयाचे आहेत. शासन निर्णयातील तरतुदीनुसार क्रीडा गुण सवलत अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा या करिता दि. 11 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जातील. कोणताही खेळाडु विद्यार्थी क्रीडा गुण सवलतीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन हा संघ कमाल…. हा विजय ऐतिहासिक!

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक सरसकट पंचनामे करा-पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन