vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व मार्गदर्शन सत्र> नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी> थेट मुलाखतीने निवड> विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी मार्गदर्शन मिळणार

बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व मार्गदर्शन सत्र> नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी> थेट मुलाखतीने निवड> विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी मार्गदर्शन मिळणार

 

बुलडाणा, प्रतिनिधी): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करियर सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दि.२१ मार्च रोजी पंकज लद्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज, येळगाव, बुलढाणा येथे होणार आहे.

या मेळाव्यात जस्ट डायल लिमिटेड, पुणे; भारस्कर सर्विसेस, पुणे; टॅलेंट सेतु, पुणे; स्वतंत्र मायक्रो फायनान्स; क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कूटा यांसारख्या ८ पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी ४७० पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केलेली आहे. या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड केली जाईल. तसेच, केंद्र शासनाच्या पीएम इंटर्नशिप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सहभागातून इस्राइलमध्ये उपलब्ध रोजगार संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://mahaswayam.gov.in व श्रम आणि रोजगार मंत्रालय भरात सरकार अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरच्या https://www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी असलेल्या अथवा नसलेल्या १० वी, १२ वी, आय टी आय, पदवीधर पुरुष / महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून घ्यावी. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही.

तसेच या रोजगार मेळाव्यात पात्र, गरजु व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनीधीसमवेत मुलाखत द्यावी.

बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी 07262242342 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करीयर सेंटर बुलढाणाचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी

vishwatmaklokswamivarta

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta