vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेबाबत रांजणगाव(शें.पू.)येथेशुक्रवारी (दि.२८) ग्रामस्थांची कार्यशाळा..

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेबाबत रांजणगाव(शें.पू.)येथेशुक्रवारी (दि.२८) ग्रामस्थांची कार्यशाळा..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- रांजणगाव (शें.पू.) त. गंगापूर या गावात प्रत्येक घरी सौर उर्जेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर योजना राबविण्यासाठी शुक्रवार दि.२८ रोजी ग्रामस्थांची कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे. रावते मंगल कार्यालय, रांजणगाव (शे.पू.) येथे शुक्रवार दि.२८ रोजी सायं. ५ वा. या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आ. प्रशांत बंब हे राहणार असून कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे हे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेस महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे आयोजन सरपंच योगिता महालकर, उषा हिवाळे, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, दीपक बडे आदींनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..- 31 ऑक्टोबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रगत टपाल तंत्रज्ञान (IT 2.0) प्रणाली ४ ऑगस्टपासूनकार्यान्वित होणार; देखभाल, दुरुस्तीसाठी २ ऑगस्ट रोजी सेवा स्थगित

vishwatmaklokswamivarta

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…