vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई’ प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ प्रवेशासाठी मुदतवाढ; ०१ एप्रिल पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू

आरटीई’ प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ प्रवेशासाठी मुदतवाढ; ०१ एप्रिल पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)- ‘आरटीई २५ % प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळविण्यात येते कि सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.२४ मार्च, २०२५ या तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस दि. ०१ एप्रिल, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

    प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, त्या बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे. तसेच या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

नूतन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल**विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा*

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेवून नियोजन करावे– पणन मंत्री जयकुमार रावल24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार..

vishwatmaklokswamivarta

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा