vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

31 मार्चला कोरडा दिवस जाहीर

31 मार्चला कोरडा दिवस जाहीर

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी किंवा चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे रमजान ईदचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि सार्वजनिक शांततेस बाधा येऊ नये, यासाठी दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ३१ मार्च “कोरडा दिवस” म्हणून जाहीर केला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

 बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, परवानाकक्ष, तसेच बिअर बार संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत. सर्व अनुज्ञप्तीधारकांनी हे आदेश पाळावेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात #विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराचा शुभारंभ…

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती