vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईच्या पवई येथील साकी विहार रोडवरील निवासी संकुलात एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षक भवानीप्रसाद झा  यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस  करत आहेत

याबाबतची माहिती अशी की

भाषेच्या मुद्द्यावरून हाणामारी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बँकांमध्ये मराठीचा सक्तीने वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर, मनसे कार्यकर्ते सातत्याने बँकांमध्ये जाऊन मराठीत व्यवहार करण्याची पाहणी करण्यास सांगितले होते. त्याचवेळी पवईतील एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.

३१ मार्च रोजी रात्री कामावर असताना, एका डिलिव्हरी बॉयशी त्यांची चर्चा झाली. अजिंक्य असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून, तो ऑर्डर डिलिव्हरीसाठी आला होता. भवानी प्रसाद झा यांनी त्याच्याशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे अजिंक्य नाराज झाला. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर अजिंक्यने झा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले.

वाद वाढत गेल्याने वैतागून झा यांनी मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अजिंक्य संतप्त झाला आणि तो काही वेळाने विजय निकम, संजय मुले आणि महेश गिरम या तीन सहकाऱ्यांसोबत परतला. या चौघांनी मिळून झा यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून माफी मागायला लावली

या घटनेनंतर भवानीप्रसाद झा यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजिंक्य आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले. पोलिसांनी ते चित्रीकरण मिळवले असून त्याद्वारे पवई पोलीस तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई-  Dark Web वर कोड वापरून ड्रग्जची तस्करी करणारीआंतरराष्ट्रीय,टोळी गजाआड, 3.45 कोटींचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

नवलारी गडचिरोली: महिला सक्षमीकरणाचा ‘गड’

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गाची चाचणी संपन्न

vishwatmaklokswamivarta