vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध..

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध..

ठाणे, प्रतिनिधी):- सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती इ. 9 वी ते 12 वी पर्यंत (चार वर्षांसाठी) मिळते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.1 हजार असून वार्षिक रु.12 हजार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि.22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि.07 फेब्रुवारी 2025 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना / पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इत्यादी बाबतची दुरुस्ती असल्यास दि.18 फेब्रुवारी 2025 पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी/पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी मंगळवार, दि.01 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि.22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी 2 लाख 48 हजार 758 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11 हजार 682 शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MOE), नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी 4% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इ. 7 वी व 8 वी ची विद्यार्थी संख्या व 12 ते 14 वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. ही निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

तसेच, परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्याथ्यांनी हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे, असे आवाहनही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 29.24 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 31746 क्युसेक्स तर वारणा धरणातून 14880 क्युसेक्स विसर्ग सुरू..

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी