vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटना देशव्यापी आंदोलन छेडणार..

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटना देशव्यापी आंदोलन छेडणार..

       मुंबई प्रतिनिधी- अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा जनसुरक्षा कायदयाविरोधात पत्रकार संघटनांनी तीव्र निदर्शने करून हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून या मागणीचा विचार न केल्यास सरकारच्याविरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पत्रकार संघटनांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निदर्शने करताना दिला.

  यावेळेस पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त मुंबईतील आझाद करीत आपली भूमिका मांडली. त्यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब , मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ , मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ यांचे अध्यक्ष, पदाधिकारी,पत्रकार सहभागी झाले होते.

  पत्रकारांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आम्हाला मान्य नाही!” असे सांगत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, सरकारने अशी मनमानी करू नये. तर एस एम देशमुख म्हणाले, पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून जशी आम्ही आंदोलन केली तशी पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला भाग पाडू नका, तर जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे म्हणाले, सरकार विरोधास पडलेली ही आंदोलनाची ठिणगी भडका होण्याअगोदर सरकारने गांभीर्याने विचार करावा, जेष्ठ पत्रकार किरण नाईक म्हणाले, आता आम्ही मागे हटणार नाही, तर जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे म्हणाले, हे विधेयक पत्रकार विरोधी असल्याने तीव्र विरोध करावा लागेल.

   जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ म्हणाले, जनतेवर अंकुश ठेवायची भीती का वाटते, प्रवीण पुरो म्हणाले, सर्व पत्रकारांनी सरकारला पत्र पाठवत विरोध करावा लागेल, संपादक शैलेंद्र शिर्के म्हणाले, आपण सर्वांना न्याय देण्यासाठी आवाज उठवून बातमी करतो.आपणास आता आपल्यालाच न्याय द्यायचा आहे. प्रेस क्लब चे पदाधिकारी सौरभ शर्मा म्हणाले, ही लढाई आता तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही, मिलिंद अष्टिवकर म्हणाले, ईडी, सीबीआय झाली आता हे विधेयक आणले आहे, पत्रकार विनोद साळवी म्हणाले, पत्रकारांनी अशी एकजूट अजून दाखवली पाहिजे. बृहन्मुंबई महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष मारुती मोरे म्हणाले आता आंदोलनाची ही सुरुवात आहे. सरकारने अंत पाहू नये.   हा कायदा पत्रकारांच्या हक्कांवर घाला घालणारा आहे. जर तो लागू झाला, तर पत्रकारांवर अनेक निर्बंध येतील आणि सत्य बाहेर आणणे कठीण होईल.” या कायद्यामुळे सरकारला कोणतीही बातमी ‘राष्ट्रहिताविरोधी’ असल्याचे सांगून हटवण्याचा अधिकार मिळणार आहे. तसेच, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर देखील बंधने लादली जाण्याची शक्यता आहे.असे संदीप चव्हाण यांनी सांगितले.

  यापूर्वीही पत्रकारांवरील नियंत्रण वाढवण्याच्या प्रयत्नांना विरोध झाला होता. मात्र, यावेळी पत्रकार संघटनांनी एकत्र येत सरकारविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे.

संघटनांनी स्पष्ट केले आहे की, जर सरकारने कायदा मागे घेतला नाही, तर देशव्यापी आंदोलन छेडले जाईल.

संबंधित पोस्ट

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाजिल्ह्याचा कृती आराखडा सर्वसमावेशक करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा* 

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचीही भक्ती प्रबोधनात्मक स्वच्छता दिंडी

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta