vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

 

राज्य प्रतिनिधी

परभणी,: शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल, उत्पादक पुरवठादार कंपन्याचे उत्पादने, प्रात्यक्षिके, जनसंवाद, महाआरोग्य शिबीर असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, याचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे रुपरेषा पुढील प्रमाणे आहे. सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. दुपारी 2.30 वाजता महिला व बालविकास विभागाशी निगडीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा ई-भूमिपूजन / ई-लोकार्पण कार्यक्रम, दुपारी 02.30 वाजता शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र होणार आहे.दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. महाआरोग्य शिबीराचे उ‌द्घाटन होणार आहे. सकाळी 11.00 वा. सेलू येथील महावितरण विभागाच्या कार्यालयाचे उ‌द्घाटन होणार आहे.

संबंधित पोस्ट

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनमेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी..

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणेची सज्जता 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta