vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे)- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा 100 दिवसांचा सात कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आज मंगळवारी, दि.08 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आला होता.‌

याप्रसंगी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण आत्मसात करा. आधुनिक तंत्रज्ञानाचा दररोजच्या कामकाजात वापर करून कामाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाऊडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्निल बावा यांनी मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.‌

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, “१०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून कर्मचाऱ्यांना काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये गती, पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकोपयोगी कामकाज उत्तमरीत्या करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणाचा सर्व कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येईल.”

सॉफ्टवेअर डिझाईन, डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी काग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाऊडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्निल बावा यांनी कॅनवा पावर पॉइंट प्रेझेंटेशन, चॅट जी पी टी, क्लॉड, आयडियो ग्राम अशा ए आय टूल्स सारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात होणाऱ्या वापराबद्दल उत्तम प्रशिक्षण दिले. यावेळी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले.‌

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे, मुख्य लेख व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे तसेच कोग्निडॉल्फ व क्लाऊडटेल्स येथील प्रशिक्षक‌ मिहीर लोहकरे, रोहन फोन्सेका, आईशा शेख, पल्लवी ठाकूर, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्णत्वास आनण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी- कर्मचारी यांनी नियोजन केल्याबद्दल प्रशिक्षणार्थीनी अभिनंदन केले.‌

कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील अत्यंत उपयोगी आणि दर्जेदार प्रशिक्षण आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा शासकीय कामकाजात खूप जास्त उपयोग होणार आहे आणि शासकीय कामकाज कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी मदत होईल. तसेच कामांमध्ये जास्त पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी असे प्रशिक्षण राबविण्यात आले आहे. कमीत कमी वेळेत जास्त काम करून लोकोपयोगी काम करण्यासाठी मदत होईल – कनिष्ठ सहाय्यक लेखा (अर्थ विभाग) गंगाधर बोरकर

०००

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे – कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह कुंभमेळा प्राधिकरणातर्फे साधू महंत यांच्याशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी-फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

vishwatmaklokswamivarta