vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे अमेरिकेत स्वागत**संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले अमेरिकेत दाखल*

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे अमेरिकेत स्वागत**संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले अमेरिकेत दाखल*

 

विदेश प्रतिनिधी- मुंबई / न्यूयॉर्क – विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या मुख्यालयात करण्यात आले आहे. दरवर्षी युनो च्या मुख्यालयात भीम जयंती चे आयोजन केले जाते.या भीम जयंती महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आज अमेरिकेत दाखल झाले.त्यांचे अमेरिकेत न्यूयॉर्क च्या जॉन केनेडी विमानतळावर अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी स्वागत केले. अमेरकेतील आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते दिलीप मस्के आणि दीपक बन्सल यांनी ना.रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे न्यूयॉर्क विमानतळावर स्वागत केले.अमेरिका दौऱ्यात ना.रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सीमाताई आठवले आहेत.ना.रामदास आठवले हे 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून येत्या 18 एप्रिल रोजी भारतात परतणार असून मुंबई विमानतळावर त्यांचे सकाळी 11 वाजता आगमन होईल असे रिपब्लिकन पक्षा तर्फे कळविण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा विचार जगाला तारणारा- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या सर्व भारतीयांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षण धोरण विषयक चर्चेचे 10 वे सत्र नवी दिल्लीत संपन्न

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

आर्मेनियातील भारतीय दूतावास, टोवमास्यान फाउंडेशन आणि लुईसयोगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने #InternationalDayOfYoga2026 निमित्त १०८ सूर्यनमस्कारांच्या प्रेरणादायी सत्राचे आयोजन

वेल्श सरकारच्या गुंतवणुकीच्या स्वारस्याचे महाराष्ट्रात स्वागत– वेल्श नॅशनल डे निमित्त राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta