vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी : शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा व संशोधन तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार करण्यात आले. हॉटेल ताजमध्ये बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सांमजस्य करार करण्यात आले.

यावेळी बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखालील बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ, बेल्जियमचे भारतातील राजदूत, अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते. देशातील नामवंत कंपन्यांचे मुख्य कार्यकारी आधिकारी आणि भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचे प्रतिनिधी यांनी सामंजस्य करारवर स्वाक्षरी केल्या.

बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा व संशोधन आदी क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी १२ सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य करारामुळे बेल्जियमशी मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

संबंधित पोस्ट

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

२१ जून रोजी ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा; नागरिकांनी सकाळी ६:४५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन

शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

vishwatmaklokswamivarta