vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उर्दू ‘कारवा’या साहित्यिक संस्थेच्यावतीने जागतिक मराठी दिन संपन्न

उर्दू ‘कारवा’या साहित्यिक संस्थेच्यावतीने जागतिक मराठी दिन संपन्न

( सुरेश गायकवाड )   मुंबई- आपली आठ वर्षांची जुनी परंपरा कायम ठेवत मुंबई च्या साहित्यिक संस्था उर्दू कारवांच्यावतीने जागतिक मराठी दिनानिमित्त नुकताच संपन्न झाला.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला उर्दू ‘कारवा’चे अध्यक्ष फरीद अहमद खान यांनी मराठी दिनाचे उद्दिष्टे स्पष्ट केली. मराठी कविता आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त अंतरराष्ट्रीय मराठी दिन साजरा केला जातो, त्यांची एक कविताचे उर्दू अनुवाद फरिद अहमद खानने सादर केली.फरीद अहमद खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कय्युम शेख यांनी पाहुण्यांना पुष्प देऊन स्वागत केले. मराठी कथांचे उर्दूमध्ये अनुवाद करणारे कासीम नदीम यांनी मराठी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रस्तावनेचा उर्दू अनुवाद या कार्यक्रमात सादर केला.    या कार्यक्रमात सहभागी झालेले वक्ते आणि अतिथी मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाशी संबंधित डॉ. मुझम्मिल सरखोत यांनी मुंबई विद्यापीठाच्या उर्दू कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्य व कार्यविभागाशी संबंधित डाॅ. मूझम्मिल सरखोत यांनी साहित्यिक सेवेचा उल्लेख केला. त्यांनी मराठी भाषेतील उर्दूच्या स्पष्ट शब्दांकडे लक्ष वेधले.

उर्दू वृत्तपत्र हिंदुस्थानचे संपादक सरफराज आरजू यांनी सांगितले की सरकारी कार्यालयापासून ते न्यायालयापर्यंत आणि दैनंदिन जीवनात शुद्ध उर्दू शब्दांचा मोठा संग्रह आहे.उर्दू वर प्रेम करणारा कोणीही मराठीच्या विरोधात असू शकत नाही.   मराठीत सतत लिहीणार आणि उर्दूचे अभ्यासक औरंगाबादहून आलेले अतिथी नौशाद उस्मान म्हणाले की, मुस्लिम म्हणून आपण सर्व भाषांचा आदर करणे आवश्यक आहे.गायिका शबाना शेख यांनी दोन सुंदर मराठी गाणी गायली आणि संगीताने मैफल रंगवली.   या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात डाॅ. मुसर्रत साहब अली, प्राचार्य शबाना वनू, प्राचार्य सायरा खान, प्रा. राहिल, प्रा. महक, वकार अहमद, अब्दुल कय्युम नईमी, तौसीफ कातिब, वसीम सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या – गणेश सवाखंडे

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत