vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती विमानतळ आणि प्रवाशी विमानसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केंद्रीय आणि कॅबिनेट राज्य मंत्र्यांचा दौरा

अमरावती विमानतळ आणि प्रवाशी विमानसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केंद्रीय आणि कॅबिनेट राज्य मंत्र्यांचा दौरा

 

अमरावती, प्रतिनिधी-: अमरावती विमानतळ व प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक होणार आहे.

यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धिरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रतापदादा अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केले आहे.

पोलीस विभागाच्या प्रशासकीय तसेच निवासस्थान इमारतींचे लोकार्पण कार्यक्रम,मुख्यमंत्री यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील मौजे कोंडेश्वर येथील व इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारतींचा तसेच शासकीय चारचाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम उद्या दुपारी 12 वाजता सर्वे नंबर 29, मौजा बडनेरा, (कोंडेश्वर) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष तसेच

महिला विसावा कक्षाचे लोकार्पण कार्यक्रम,पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर यांच्यासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्षाचे लोकार्पण कार्यक्रम पोलिस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर यांच्यासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्षाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांच्याकडून मंजूर अनुदानातून पोलीस आयुक्त कार्यालयासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

000000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, -: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण, तसेच एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता कौंडेश्वर येथे दुपारी 1 वाजता जिल्हा ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे निवासस्थान व पोलीस ठाण्यांचे लोकार्पण, तसेच शहर पोलीस दलाच्या अत्याधुनिक व पायाभूत सुविधेकरिताच्या वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील.

त्यानंतर दुपारी 2 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दुपारी 2.15 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान निधी वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. संत गाडगेबाबा विद्यापीठ येथे दुपारी 3.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह व क्रीडा संकुल भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4.10 वाजता अमरावती विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

अमरावती, – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी 10.40 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण, तसेच एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दौरा

अमरावती, : केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 10.45 वाजता मुंबई येथून अमरावती विमानतळावर आगमन. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांचा दौरा

अमरावती, : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, सकाळी 9.30 वाजता दिल्ली येथून अमरावती विमानतळावर आगमन होईल. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत अलायंस एअरच्या प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 11. 45 वाजता विमानाने शमशाबादकडे प्रयाण करतील.

00000

संबंधित पोस्ट

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

vishwatmaklokswamivarta

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास,सुधारित प्रस्ताव सादर करावाकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत,कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली

vishwatmaklokswamivarta

विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस