vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्तआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश..

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्तआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश..

गडचिरोली प्रतिनिधी: नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या ५ महिन्यांपासून पद रिक्त होते. रिक्त पीठासीन अधिकारी पद नियुक्त करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्‍पीय अधिवेशनादरम्‍यान उच्च शिक्षण मंत्री, अवर मुख्य सचिव यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्‍यानुसार १७ एप्रिल २०२५ रोजी शासनाने आदेश काढून पिठासीन अधिकारी नियुक्‍त केल्‍याने मागणीला यश आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ कलम ८१ अन्वये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणेची स्थापना करण्यात आली आहे. सदर न्यायाधिकरणाची कार्यक्षेत्र ही विद्यापीठ व संलग्नीत खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाविषयक याचिका व अपील याचिका यांचा निपटारा करण्याची तरतुद विषद करण्यात आली आहे. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्षेत्रातील नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी दि. ३०/१०/२०२४ रोजी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या ५ महिन्यांपासून पद रिक्त होते. सदर कार्यक्षेत्रातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बडतर्फ, सेवानिवृत्त कर्मचारी, निवृत्त वेतन, पदोन्नती, वेतननिश्चिती याचिका, अनेक तक्रार निवारण समिती अपील याचिका व अन्य सेवाविषयक याचिका प्रलंबित असून न्यायाच्या प्रतिक्षेत होते. त्‍यामुळे तात्‍काळ पिठासीन अधिकारी नियुक्‍ती करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्‍पीय अधिवेशनादरम्‍यान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,  अवर मुख्य सचिव श्री. बी. वेणूगोपाल रेड्डी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती.

त्‍यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. १७ एप्रिल २०२५ रोजी शासन आदेश काढून नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्‍यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकारी पदाचा अतिरिक्‍त कार्यभार न्‍या. श्री. बी.यु. देबडवार यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्‍यांच्या नियुक्‍तीने न्‍यायाधिकरणातील प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार आहे. भविष्यात नियमित पिठासीन अधिकारी नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्‍याचे आमदार अडबाले यांनी सांगितले. कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले आहे.

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर तालुक्यातील प्रमाणभूत क्षेत्राची अनुसूची प्रसिध्द- तहसीलदार तेजस्विनी पाटील

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन;*नाविण्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन द्या- गुलाब खरात *• पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती! हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

vishwatmaklokswamivarta