vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

१९३५ वर्ष पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

१९३५ वर्ष  पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

मुंबई: प्रतिनिधी १९३५ साली बांधकाम केलेले १०८ पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगर पालिकेने तोडल्याने पालिके विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज संतप्त झाला असून, सर्व जैन समाजाच्या वतीने विलेपार्ले ते अंधेरी येथील के. एल महानगरपालिका पर्यंत आंदोलन करणार आज मोर्चा काढून निषेध जाहीर करणार असल्याची माहिती जैन समाजामार्फत देण्यात आली आहे

[ याबाबत  प्रवीण जैन यांनी सांगितले की, “अहिंसक आणि शांतताप्रिय जैन समाजाच्या श्रद्धास्थानांवर प्रशासनाने जाणूनबुजून केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र जाहीर विरोध करतो. ही केवळ मुंबईतील नव्हे तर संपूर्ण देशातील जैन समाजाच्या श्रद्धेवर आघात आहे असे अनिल शाह यांनी सांगितले.समाजाने संपूर्ण देशभर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला असून, पुढील काळात अहिंसक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पीयुष शाह,राजेश जैन,विकास अच्या, खुशालभाई शाह, भरत बाफना

राष्ट्रीय अध्यक्ष नवरत्न परिवार संस्थापक आचार्य श्री विश्वरत्नसागर सूरिश्वरजी महाराज उपस्थित होते. न्यायालयाने याबाबत समाजाच्या व मंदिराच्या बाजूने भूमिका घेतली असतानाही पालिका मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे शनिवारी होत असलेल्या या जैन आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवाने सामील व्हावे असे आवाहन केले आहे. या आंदोलनात देशभरातील साधू संत राजकीय नेते सहभागी होणार आहेत.

संबंधित पोस्ट

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात संपन्न

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध..

vishwatmaklokswamivarta