vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवाद २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवादआज २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून “संवाद मराठवाड्याशी” हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, त्याअंतर्गत २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागातील नागरिकांच्या अडचणी, समस्या, सूचना आणि अपेक्षा समजून घेण्यात येणार असून त्यानुसार संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात येणार आहेत. सदर वेबिनारमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

संबंधित नागरिकांसाठी वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक लिंक व क्युआर कोडही प्रसिध्द करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तरी मराठवाडा विभागातील पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांनी या संवादात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

पाणी टंचाई00000

संबंधित पोस्ट

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात

vishwatmaklokswamivarta

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta

रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta