vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

व्यायामशाळा बांधकामाच्या अनुदान रकमेत वाढ पात्र संस्थांनी लाभ घ्यावा

व्यायामशाळा बांधकामाच्या अनुदान रकमेत वाढ पात्र संस्थांनी लाभ घ्यावा

रायगड( प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत विविध अनुदानीत योजना ह्या जिल्हा वार्षिक योजनांतर्गत राबविल्या जात आहेत यात प्रामुख्याने व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान योजना असून रु.7.00 लक्ष पर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात येते होते. बांधकाम दरात होणारी वाढ विचारात घेता आता व्यायामशाळा बांधकाम विकास अनुदान दरात आता वाढ करण्यात आली असून रु.14.00 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली आहे.

तर क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत तयार करणे, 200 अथवा 400 मी.चा धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे अथवा तारेचे कंपाऊन्ड बांधणे, विविध खेळांची प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधन गृह चेंजिंग रुम बांधणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा मैदानावर निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लडलाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, प्रेक्षक गॅलरी, ड्रेनेज व्यवस्था इ. बाबींसाठी रु.7.00 लक्ष इतके अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानामधून रु.3.00 लक्ष इतके अनुदान क्रीडा साहित्यासाठी दिले जातात.

राज्य शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मिती योजनेमधून विविध खेळांची क्रीडांगण विकसित करणे, विविध आकारामानाची बंदिस्त प्रेक्षागृह बांधणे, जलतरण तलाव, ऐंस्ट्रोटर्फ हॉकी क्रीडागण इ. सह विविध क्रीडाविषयक कारणासाठी व खेळांच्या क्रीडा साहित्यासाठी किमान अनुदान रु.25000/- ते रुपये 1.20 कोटी पर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात येते. या अनुदानाबाबतचे अर्ज वितरण दिनांक 25 एप्रिल ते दि.31 मे, 2025 पर्यंत करण्यात येत असून परीपूर्ण अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 15 जून 2025 असून विहित मुदतीत अर्ज सादर करणाऱ्या संस्थांचेच अर्ज अनुदान मंजुरीसाठी विचारात घेतले जातील. या अनुदानासाठी पंजीबध संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक/माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परीषद, आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा, शासकीय विभाग/कार्यालये इ.पात्र असून या संस्थांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड 8369643502/7738051502 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

vishwatmaklokswamivarta

इस्लामपूर येथे आज विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा…

vishwatmaklokswamivarta

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

प्रयागराज येथे महाकुंभच्या शेवटच्या महाशिवरात्री दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य…

vishwatmaklokswamivarta