vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

 

बदनापूर / जालना (प्रतिनिधी) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असून तालुका , जिल्हा ,राज्य आणि देश सुधारले, आता फक्त माणसं सुधारण्याची गरज आहे,असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केले.

आशयघन प्रकाशनाचे शालेय विद्यार्थ्यांच्या रचित कवितांचे विनोदकुमार पांडे संपादित “विल्हाडीच्या बालकविता” संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र दिनी गुरुवारी ( ता. 01)

जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भावकवयित्री डॉ.संजीवनी तडेगांवकर ,आशयघन प्रकाशनाचे पंडितराव तडेगांवकर,रोटरी क्लब ऑफ जालनाचे रो. दीपक बगडिया,सचिव रो. रवी भक्कड,सरपंच ममता इनामे, शालेय समिती अध्यक्ष भगवान कान्हेरे, संजय खरात, मुख्याध्यापक विष्णू सोनटक्के, ज्ञानेश्वर इनामे,विनोद कुमार पांडे ,ग्रा.पं.व शालेय समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

रावसाहेब पाटील दानवे यावेळी म्हणाले, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे वाढलेले प्रमाण हे चिंताजनक असून बालवयातच शिक्षणाप्रती गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वळण देण्याचे काम गुरुजींनी करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रकाशित पुस्तकाचे मुखपृष्ठ ,शीर्षक, सुलेखन, रेखाटने येथील विद्यार्थ्यांचे असल्याबद्दल दानवे यांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. संजीवनी तडेगांवकर यांनी ग्रंथावर भाष्य करताना धडपडणारे, व्यासंग असणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची योग्य किंमत करतात, असे सांगून काव्यसंग्रहात विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि शब्दांची ताकद उमटली आहे असे त्यांनी सांगितले.

पंडितराव तडेगांवकर यांनी कविता प्रकार हा अवघड असला तरी भावना व्यक्त करण्यासाठी सोपा आहे. विद्यार्थ्यांनी आपलं भोवताल कवितेत ठळकपणे मांडले असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात विनोदकुमार पांडे यांनी प्रशिक्षणा दरम्यान डॉ.संजीवनी तडेगावकर यांच्या मार्गदर्शना मुळेच आपल्याला प्रेरणा मिळाली असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला ग्रामस्थांचे बहुमोल सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जालनाच्या वतीने शाळेत बसवण्यात आलेल्या फरशा ,गट्टूंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वेणू कान्हेरे, कमल क्षीरसागर यांच्या सह विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक विष्णू सोनटक्के यांनी आभार मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्रीकांत अगमे,शिवहरी मेहेत्रे ,प्रकाश बंड ,शिवाजी तिडके, दत्ता वड्डे, विठ्ठल कान्हेरे, काकासाहेब खरात, लोखंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक ,पालक ,आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0000000

 

_________

संबंधित पोस्ट

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

महाविस्तार एआय अप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’शेतीविषयक कोणताही प्रश्न विचारा, त्वरित मिळेल तज्ज्ञ सल्ला

vishwatmaklokswamivarta