vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट’ परीक्षा सुरळीत…

‘नीट’ परीक्षा सुरळीत…

 

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी- नीट २०२५ची परीक्षा आज शहरातील ४९ केंद्रांवर पार पडली. तब्बल १९ हजार ५०० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ होते. त्यापैकी १९१७९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षेस हजेरी लावली. उपस्थितीची टक्केवारी ९८.३५ टक्के इतकी होती. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्जता केली होती. वाढत्या उन्हाची स्थिती पाहता प्रत्येक परीक्षा केंद्रावर पिण्याचे पाणी, सावलीची सोय आदी सुविधा करण्यात आल्या शिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथक देखील सज्ज ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः काही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा केंद्रावर उपलब्ध सुविधा व सज्जतांची पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार न होता परीक्षा सुरळीत पार पडली अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी दिली.

संबंधित पोस्ट

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू–जनकपूर प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू

1 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट विक्रमी गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

गडचिरोली शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा द्यावा..