vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालतीत १६३५ प्रकरणात १८ कोटींहून अधिक रकमेची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत १६३५ प्रकरणात १८ कोटींहून अधिक रकमेची तडजोड

 

      छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि.१०) पार पडलेल्या लोकअदालतीत १८ कोटी ९५ लाख १७ हजार ९७७ रुपयांच्या रकमेचा समावेश असलेली १६३५ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी दिली आहे.

 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा सत्र न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश गिरिश अग्रवाल हे या लोकअदालतीच्या अध्यक्षस्थानी होते.

 या लोकअदालतीत मोटार अपघात, विद्युत चोरी, धनादेश अनादर, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे, तसेच विविध बॅंकांची व वित्तीय संस्थांची वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

 या लोकअदालतीत एकूण १५३० प्रलंबित व १०५ दाखलपूर्व असे १६३५ प्रकरणे तडजोडी ने निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये १६ कोटी १४ लाख ७७ हजार ५१० रुपये तर वादपूर्व प्रकरणांमध्ये २ कोटी ८० लाख ४० हजार ४६७ रुपये असे एकूण १८ कोटी ९५ लाख १७ हजार ९७७ रुपये इतकी रक्कम तडजोडीने निकाली निघाली. या लोकअदालतीसाठी २९ पॅनेल तयार करण्यात आले होते.

०००००

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

vishwatmaklokswamivarta

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

गणपती विसर्जन ज्या ठिकाणी होते ते कुंड पाण्याने गच्च भरलेले असून कोणत्याच प्रकारची सेक्युरिटी नाही व शिशुभिकरणाचे कामअर्धवट दिसून येत आहे गणपती अवघ्या बारा तेरा दिवसावर

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जोरदार तयारी सुरू..

मुंबईतील कांजूरमार्ग कचरा डेपोसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक.