vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेत प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर धडक कारवाई

प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेत प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर धडक कारवाई

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहीमा सातत्याने सुरु असून या माध्यमातून एकल वापरातील प्लास्टिक नागरिकांकडून वापरलेच जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.

या अनुषंगाने परिमंडळ 1 विभागाच्या भरारी पथकाने उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एकल वापरातील प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणा-या छोटया टेम्पोवर धडक कारवाई केली. यामध्ये आढळलेले 50 किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचे गठ्ठे जप्त करण्यात आले. तसेच रू. 5000/- दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आलेली आहे.

 अशाचप्रकारे परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने से.11 घणसोली येथील बी मार्ट मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने तेथे उपलब्ध प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून रू. 5000/- दंडात्मक रक्कमही वसूल केलेली आहे.

त्याचप्रमाणे परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने आज से.6, ऐरोली येथील तपासणीत महालक्ष्मी फास्ट फूड या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडून रू. 5000/- इतकी रक्कम दंड स्वरुपात वसूल केली असून त्यांच्याकडे असलेला 1 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केलेला आहे.

     प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा व त्यातही प्राधान्याने आढळणारा प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांकडून थांबावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर केला जावा यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारेही बाजारात वापरल्या जाणा-या प्रतिबंधात्मक प्लास्टिकवर दंडात्मक कारवाई करुन नियंत्रण आणले जात आहे.

  तरी प्लास्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी जीवनाला असलेला धोका लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा व प्लास्टिक वस्तूंचा वापर पूर्णपणे टाळावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राला भेट देत केंद्रीय वस्त्र मंत्रालय सचिव श्रीम. नीलम शमी राव यांच्याकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीस प्रारंभ

नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार; समिती काढणार वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा…

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे योजनांचा जागर

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश