vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

 

गडचिरोली, प्रतिनिधी : आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील रहिवासी श्रीमती इंदिराबाई सहारे यांना रानटी हत्तीच्या हल्ल्यात नुकतेच गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यानच राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत त्यांच्याशी संवाद साधला आणि आस्थेने त्यांच्या तब्येतीची चौकशी करून वनविभागातर्फे नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.श्रीमती सहारे यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी ॲड. जयस्वाल यांनी वनविभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्यात यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप

रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा;रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश..

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…

आताची मोठी बातमी- | मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सूचना 🚆🌧️मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्यांची पाहणी

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न