vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक

 

जालना (प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा आज जालना जिल्हा दौरा झाला. या निमित्ताने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सकाळी १०.०० वाजता भाजपच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद बैठक घेतली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जयंतीनिमित्त सुरु असलेल्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक पातळीवरील विकासकामे, तसेच जालना जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील संधी आणि आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विकासाचा प्रत्येक भाग हा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे. सरकार आपल्या सोबत असून, जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या प्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्षांनी बोलताना म्हणाले की, “अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम पक्षाच्या वतीने सुरु आहेत, अहिल्याबाई होळकर यांनी जनतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य, न्यायनिष्ठा आणि सत्तेचा लोकहितासाठी वापर, हे आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श घेऊनच आपण कार्यकर्त्यांनी समाजात आपले योगदान द्यावे. तसेच आपल्या पक्षाचे बळ हे कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. मत मांडा व पक्ष वाढवा ही आपली भूमिका असून, प्रत्येक कार्यकर्ता मतदारांपर्यंत पक्षाच्या धोरणांची माहिती पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर राहिला पाहिजे.

जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षवाढ ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर पक्षाची सेवा करताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. विकास आणि विश्वास हे आपल्या कार्याचे सूत्र असले पाहिजे.

यावेळी रामेश्वर भांदरगे, विजय कामड, विमलताई आगलावे, बद्रीनाथ पठाडे, अशोक आण्णा पांगारकर, देविदास कुचे, सतीश जाधव, सुनील आर्दड, सोपान पेंढारकर, चंपालाल भगत, सर्जेराव जाधव, अर्जुन गेही, धनराज काबलिये, कपिल दहेकर, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव, सखुबाई पणबिसरे, स्नेहा जोशी, सुषमा खरात, शारदा काळे, सुनील खरे, संजय डोंगरे, प्रदीप पवार, रवींद्र अग्रवाल, दिपक ठाकूर, सुनील पवार आदीसह सर्व मोर्चा, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, प्रकोष्ट / सेल / आघाडी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित …

संबंधित पोस्ट

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी २२ जुलै रोजी खामगाव येथे रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे आयोज न चिखली येथे प्लेसमेंट ड्राईव्ह

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा !- महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन