vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची 10 जून मुदत..

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची 10 जून मुदत..

        सांगली, प्रतिनिधी: सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत दि. 10 जून 2025 असून इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालय यांच्याकडे विहित मुदतीत सादर करावेत, असे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.   केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2025-26 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करिता 13+1 (या व्यतिरीक्त वेंकटगिरी करिता 2 जागा कॉन्युलिंगच्या घेण्याबाबत नमूद आहे) च्या प्रवेशासाठी उमेदवारांनी निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.

10 जून 2025 पर्यंत मागविण्यात आले आहेत      प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन• नागरिकांना मार्गदर्शनासाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा