vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न..

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न..

अलिबाग, प्रतिनिधी:- आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर आज रोजगार हमी योजना, खारभूमी विकास विभाग मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आढावा बैठक शासकीय विश्रामगृह महाड येथे संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे,कार्यकारी अभियंता महेश नामदे ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, एन डी आर एफ, कोस्ट गार्डचे अधिकारी यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.

नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय साधावा, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, नागरिकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

संबंधित पोस्ट

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

vishwatmaklokswamivarta

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

🚨 महाड पूरपरिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष आढावा

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण‘निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी -डॉ. मनसुख

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

vishwatmaklokswamivarta