vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ‘आरटीई २५%’ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत टप्पा क्रमांक ४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना प्रवेश पूर्ण करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

   पूर्वी दि. २९ मे २०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली असताना, पालकांचा प्रतिसाद लक्षात घेता व काही अपूर्ण प्रवेश प्रक्रियेस संधी देण्यासाठी आता ही मुदत दि. ०९ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

महत्त्वाची सूचना पालकांसाठी:• टप्पा क्र. ४ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांनी प्रवेश अद्याप पूर्ण केला नसेल, त्यांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी.• ही मुदतवाढ अंतिम असून, दि. ०९ जून २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व पालकांनी वेळेत प्रवेश निश्चित करावा.      मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले की, “शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. आरटीई अंतर्गत मिळणारी ही प्रवेश संधी सर्व पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी पालकांनी वेळेत आणि नियमबद्ध पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.”    ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध होते व आतापर्यंत ८ हजार ५३९ प्रवेश झाले आहेत.

अधिक माहितीसाठी:     संकेतस्थळ: https://student.maharashtra.gov.in तसेच मदतीसाठी स्थानिक शिक्षण विभाग / BEO कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना-मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये छायाचित्र, छायचित्रण निर्देशित अंतरावरुनच करणे बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची..

vishwatmaklokswamivarta

जगाला हेवा वाटावी, अशी समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा विचार जगभरात पोहचावा, यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील- आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta