vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

रायगड प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागांतर्गत रायगड जिल्हयात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी, ता. माणगांव येथे शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहे. येथे इयत्ता 6 वी ते 10 वी साठी तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर 6 महिने किंवा नियमित शिक्षक हजर होईपर्यंत खालील विषयांकरिता तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक या पदासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज Bio-Data/Resume आवश्यक शैक्षणिक अर्हताचे कागदपत्रे अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी, ता.माणगांव येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

पदाचे नाव सहाय्यक शिक्षक (प्राथमिक), शैक्षणिक पात्रता H.Sc./B.A./B.Sc./D.Ed., विषय–, आवश्यक पद संख्या 03. सहाय्यक शिक्षक (माध्यमिक), शैक्षणिक पात्रता B.A.B.Ed. विषय हिंदी, आवश्यक पद संख्या 01. सहाय्यक शिक्षक (माध्यमिक) शैक्षणिक पात्रता B.A.B.Ed., विषय(इतिहास/भुगोल), आवश्यक पद संख्या 01.

अटी व शर्ती :- या पदावर घड्याळी तासाप्रमाणे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मंजूर दरानुसार मानधन देय राहील. सदर एकत्रित मानधना व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. उमेदवारांची निवड करतांना अनुभव तसेच TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्रधान्य देण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. अहर्ता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. सेवा प्रवेश नियम आणि शासनाकडून तदनंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सदर पदे मानधन/तासिका तत्वावर असून, भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी जास्ती करणे, भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे, सदरील पदे कधीही कोणताही कारण न देता समाप्त करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड, अलिबाग यांनी राखून ठेवलेले आहेत

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ज्येष्ठांनी मारली बाजी करमणुकीमुळे ज्येष्ठांचा उत्साह सिंगेला..

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु

S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%

बालभवन’ चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा