vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे,सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची

राज्य प्रतिनिधी : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन 26 जूनच्या अनुषंगाने अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विविध उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. दिनांक 26 जून रोजी सकाळी 11 वाजता सर्व शासकीय व खाजगी शाळा, कॉलेज, शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग आदि ठिकाणी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घ्यावी, यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त चंद्रकांत खोसे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रा.अ. समुद्रे, सहाय्यक आयुक्त ज. प. सवदत्ती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, एमआयडीसी कार्यक्षेत्रात चालू व बंद असलेल्या कारखाना परिसरात, मेडीकल दुकानात यापूर्वीच्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याची खात्री करावी. आकस्मित भेटी देवून चुकीचे ड्रग्ज विकले जाणार नाही याबाबत तपासणी करावी. शाळा सुरू होताच अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा शाळेतील शिक्षकांमार्फत दररोज परिपाठाच्या वेळी सुरू करावी. निबंध व चित्रकला स्पर्धा घ्याव्यात. डार्क स्पॉटच्या ठिकाणी लाईट व सीसीटीव्ही बसवावेत. डार्क स्पॉट, पार्क आदि ठिकाणी गस्त वाढवून तपासणी करावी. शिक्षण, आरोग्य, पोलीस, आरटीओ, उद्योग, महानगरपालिका, नगरपालिका/नगरपरिषद, एसटी महामंडळ, पोस्ट ऑफिस आदि विविध विभागांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

      पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, मागील दीड महिन्यात अंमली पदार्थ विरोधी एकूण 60 गुन्हे दाखल करून 68 आरोपीना अटक करण्यात आली. यामध्ये ताबा/विक्री/वाहतूक प्रकरणात 13 गुन्हे व 16 आरोपी तर अंमली पदार्थ सेवनबाबत 47 गुन्हे व 52 आरोपीना अटक करण्यात आली. यामध्ये एकूण 10 लाख 84 हजार 780 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगून अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत सर्व विभागांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले.

00000

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

लाचलुचपत कार्यालय ते एकखाना मस्जिद जुना बाजार येथील रोडवरील केबल नवीन टाकण्याची गब्बर एक्शन कमिटीचे शेख इस्माईल राजा यांची मागणी.

रानभाज्यांना राजश्रय देऊन गडचिरोली ब्रँड निर्माण करण्याची गरज – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी…

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी