vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळा प्रवेशोत्सव 2025 : पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सव 2025 : पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

जालना, प्रतिनिधी- जिल्ह्यात आजपासून (दि.16) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. आज शाळा सुरू होण्याच्या पहिला दिवस असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

जालना तालूक्यातील दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित राहून सर्व शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून शाळेत आणण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातंर्गत इयत्ता पहिलेमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिल्या पावलाचे ठसे घेवून त्यांचे शालेय जीवनातील प्रवेशाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जालना तहसिदार छाया पवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक-शिक्षक, दरेगाव येथील विविध मान्यवर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि मुलांची उपस्थिती वाढवण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात आला. ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत विविध मान्यवरांनी जिल्ह्यातील शाळेमध्ये उपस्थित राहून शालेय विद्यार्थ्याचे उत्सहात स्वागत केले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

महाराष्ट्रात ‘टाटा स्ट्राइव्ह’च्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतुकीचा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना

vishwatmaklokswamivarta

इस्लामपूर येथे आज विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा…

vishwatmaklokswamivarta

लेख – १ जुलै : राज्य कृषी दिन-हरित क्रांतीचे जनक – वसंतराव नाईक