vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

        सांगली, प्रतिनिधी- पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्तावांवर सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टीकोनातून कार्यवाही करावी. बँकांना पतपुरवठ्याचे दिलेले उद्दिष्ट त्यांनी विहित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे अंचलिक प्रबंधक पुनित द्विवेदी, रिझर्व बँकेचे अधिकारी राजेंद्र कानीशेट्टी, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

  या बैठकीत जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजनेचा 2024-25 अंतर्गत विविध बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. सांगली जिल्ह्याच्या सर्व क्षेत्राखालील लाक्षांकाच्या 106% म्हणजेच रक्कम रूपये 23 हजार 187 कोटी वाटप झाले आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये 11 हजार 495 कोटी तर अप्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये 11 हजार 693 कोटी वाटप झाले. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत बँकांनी केलेल्या कर्जवाटपामुळे सांगली जिल्हा देशात तृतीय स्थानी आल्याबद्दल संबंधित विभागाचे अधिकारी व योगदान देणाऱ्या बँक प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व बचत गटासाठीचे कर्ज वाटपाचे लक्षांक पुर्ण करणाऱ्या बँकाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अभिनंदन केले. यामध्ये कृषि व तत्सम क्षेत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी पीककर्ज वाटप यासह अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार बँकनिहाय उद्दिष्टे व पूर्तता, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, महिला बचत गटांना कर्ज वाटप , प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व विविध महामंडळांतर्गत पतपुरवठा अशा विविध शासकीय योजनांतर्गत कर्जवाटपाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच सन 2025-26 या वर्षाचा सांगली जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते करण्यात आले. अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी सादरीकरण केले

संबंधित पोस्ट

भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी..

vishwatmaklokswamivarta

मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार..

vishwatmaklokswamivarta

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते श्री. ऋषिकेशदादा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील खरोळा गावामध्ये दौऱ्याची होतेय सर्वत्र चर्चा..

vishwatmaklokswamivarta

 स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

vishwatmaklokswamivarta

सुरत भारतातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच 25,000 टाटा पावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स

vishwatmaklokswamivarta