vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

रायगड, प्रतिनिधी- रायगड डाक विभागाने डाक जीवन विम्याचा क्लेम युद्धपातळीवर सेटल करून कै. सुयोग अशोक कांबळे हे इनफन्ट्री सोल्जर म्हणून कार्यरत असताना शहीद झालेल्या सैनिकास आदरांजली वाहिली. अतिशय कमीवेळात डाक जीवन विम्याचा क्लेम सेटल झाल्याने देशासाठी शहीद झालेल्या यांच्या कुटुंबासाठी हा रायगड डाक विभागाचा सुखद अनुभव होता. डाक जीवन विम्याचा रु 3,36,000/- क्लेमचा धनादेश वीरपत्नी निशा सुयोग कांबळे यांना सोपवण्यात आला.

याप्रसंगी रायगड डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक राकेश मिश्रा यांनी रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर यांच्या सामाजिक बांधिलकीला प्रधान्य देण्याच्या धोरणामुळे अशी कामे यशस्वीपणे मार्गी लावत सामाजिक ऋण चुकवता आल्याचा आनंद मोठा आहे असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पोस्टमास्टर श्रीमती दर्शना सिंघासने, सैनिक कार्यालय अलिबागचे प्रतिनिधी, डाक सहाय्यक शुभम शर्मा हे उपस्थित होते. क्लेम सेटल करण्यासाठी पेण पोस्टमास्टर ज्योति बावकर, मनोज अंबुरे, देवेंद्र काते, एकता श्रीवास्तव यांनी मदत केली.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन-नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

विधानपरिषद लक्षवेधी :प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

विभागीय माहिती कार्यालयातील-टायर-विक्रीबाबत आवाहन

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल*

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

vishwatmaklokswamivarta