vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी नागरिकांनी विविध विषयांवर आपले मत द्याव

विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी नागरिकांनी विविध विषयांवर आपले मत द्याव

सातारा प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला २०४७ साली १०० वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी विकसित भारताबरोबरच विकसित महाराष्ट्राचे चित्र कसे असेल याचा भविष्यवेध घेणारे विकसित महाराष्ट्र-२०४७ असे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राजव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री यांनी दिनांक १७ जून २०२५ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केले आहे

सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विकसित महाराष्ट्र-२०४७ या व्हिजनमध्ये राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी इत्यादी मुद्दयावर आपले मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम द्यावेत

त्याचबरोबर तुमच्या कल्पनेनुसार १० वर्षानंतर आणि २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्र कसा असावा, तसेच तुमच्या इतर कल्पना किंवा विचार जे तुम्हाला मांडायचे असतील कृपया ते सुचवावेत. या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या भविष्यावेधी विकसित महाराष्ट्र-२०४७ या आराखड्यास आकार देण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करतो

सदरच्या सर्वेक्षणासाठी नागरीकांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन किंवा QR कोड स्कॅन करुन आपल्या कल्पना व विचार सुचवावेत.१)नागरिक सर्वेक्षण कालावधी १८ जून ते १७ जुलै, २०२५२)सर्वेक्षण लिंक – http://wa.link/o93s9m३)सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा

संबंधित पोस्ट

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…