vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जालना, (प्रतिनिधी) – मौजे निरखेडा येथील माजी सरपंच आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मधुकर छोटू पवार यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला.

भाजपाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी श्री. मधुकर पवार यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “भाजपाचे नेतृत्व विकासाभिमुख असून देशहित व लोकहितासाठी झटणारा पक्ष आहे. आपल्या भागाच्या प्रगतीसाठी भाजपात राहून कार्य करणे हीच खरी गरज आहे.

कार्यक्रमास तालुका अध्यक्ष संजय डोंगरे, एसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सरकटे, सरचिटणीस सुनील पवार, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा गायके, सुमित सुरडकर, गणेश खरात, नागेश अंभोरे, नारायण जाधव, गोरख गायकवाड, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गणेशोत्सव काळात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा -पालकमंत्री भरतशेठ गोगावले

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

6,600 स्थानकांवरील केंद्रीय सिग्नल नियंत्रणामुळे रेल्वे सुरक्षिततेत वाढ.