vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर निवेदने प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

जनसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर निवेदने प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

 

       अमरावती, प्रतिनिधी : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.  पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, प्रवीण पोटे-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यावेळी उपस्थित होते. जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.  वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा या विविध विषयांवरील निवेदनांवर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. पालकमंत्री यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर पोलिसांना नवीन ३३ वाहनांचा ताफा; गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे बळ पोलीस दल अधिक बळकट करण्यावर भर -पालकमंत्री शिरसाट

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-बांधकामासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी उपलब्ध करून देण्याकरिता विभागनिहाय समन्वय अधिकारी नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना…

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta