vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत 

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत

लातूर, प्रतिनिधी : शासनाने सन 2025-26 पासून खरीप हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी विमा हप्ता दर 2 टक्के आणि नगदी पिकांसाठी, विशेषतः कापसासाठी 3 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 58,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 1,160 रुपये हप्ता भरावा लागेल. तूर पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 41,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 820 रुपये हप्ता आहे. मूग आणि उडीद पिकांसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर प्रत्येकी 25,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 500 रुपये हप्ता आहे. खरीप ज्वारीसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 29,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 580 रुपये हप्ता आहे. कापसासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 57,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 1,710 रुपये हप्ता आहे. तर बाजरीसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 26,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 520 रुपये हप्ता आहे.ही योजना लातूर जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत राबविली जाणार आहे.

अवैध मार्गाने विमा काढल्यास अर्ज रद्द होईल, तसेच बोगस विमा आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान**नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७,००० वृक्ष ‘बेपत्ता’!

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ* 

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन

महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना;नोंदणीकृत गोशाळांकडून प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta