vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्याचा वारसा अमायरा समर्थपणे पेलतेय – डॉ. अश्विनी जोशी

महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्याचा वारसा अमायरा समर्थपणे पेलतेय – डॉ. अश्विनी जोशी

 

मुंबई( प्रतिनिधी )-मुंबई- महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यिक परंपरेचा वारसा त्यांची पणती अमायरा चव्हाण समर्थपणे पुढे नेत असल्याचे गौरवोद्गार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी काढले. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी ‘द ट्रेल डायरीज’ ही साहसकथा लिहून अमायराने बालसाहित्याच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण केंद्रात डॉ. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे उपस्थित होते. ही साहसकथा देशातील अग्रगण्य प्रकाशनसंस्थांपैकी एक असलेल्या पेंग्विन रँडम हाऊसच्या सहसंस्थेने – पारट्रीचने प्रकाशित केली आहे.

     “वाचनामुळे व्यक्तीला जगाचे भान येते,” हे सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने ‘द ट्रेल डायरीज’ ही कथा लिहिली असून, बालसाहित्याच्या विश्वात तिच्या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

“लेखन तुमच्या कल्पनाशक्तीला उभारी देतं. तुमच्यातील अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळतं. म्हणून मी माझ्या युवा लेखकांना सांगू इच्छिते की, जर तुमच्या मनात कथा घोळत असेल, तर ती जगाला सांगा, बेधडकपणे सांगा. तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे… मला व्यक्त होण्यासाठी माझे आई-वडील आणि ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन दिलं, त्या सगळ्यांचे मी आभार मानते,” अशी प्रतिक्रिया लेखिका अमायरा चव्हाण हिने व्यक्त केली.

  “आजच्या डिजिटल युगात मुलांना वाचनाकडे वळवणं हेच मोठं अवघड काम आहे. अशा वेळी वयाच्या ११ व्या वर्षी अमायराने चक्क पुस्तक लिहिलं आहे. यासाठी मी तिची आई – डेप्युटी कलेक्टर वैशाली चव्हाण आणि वडील – क्रीडा संघटक चेतन चव्हाण यांचे अभिनंदन करते,” असे डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या.

   “अमायराने कथेत निवडलेली पात्रं जागतिक स्तरावरची असली, तरी ती कथेत चपखल बसवली आहेत. या पुस्तकाच्या पुढील भागात अमायराने भारतातील स्थानिक नायकांना जागतिक पटलावर घेऊन यावं,” अशा शब्दांत निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.   “अमायराच्या पुस्तकाचे पुढील भाग लवकरच येतील,” असा विश्वास बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी व्यक्त केला. तर “अमायराच्या लेखनशैलीने मी प्रभावित झाले आहे,” अशी प्रतिक्रिया रीता राममूर्ती गुप्ता यांनी दिली.

 फोटो ओळ:-   यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण लिखित ‘द ट्रेल डायरीज’ या साहसकथेचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण केंद्रात करताना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी. यावेळी लेखिका अमायरा चव्हाण, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता ,बालसाहित्यिक राजीव तांबे आणि चेतन चव्हाण उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण..वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद

दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन*मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी आणि सीडीएस परीक्षा रविवारी (दि.१३);१३ उपकेंद्रांवर ४ हजार ११२ उमेदवार देणार परीक्षा

vishwatmaklokswamivarta