vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमृत’ संस्थेची प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजना; जिल्ह्यातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा– विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन, स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य..

 अमृत’ संस्थेची प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजना; जिल्ह्यातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा– विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन, स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य..

बुलढाणा प्रतिनिधी): राज्य शासनाची महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा जिल्ह्यातून खुल्या गटातील लाभार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांनी नुकतीच जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांची भेट घेतली. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धेश्वर वरणगावकर यांनी यावेळी केले.

यावेळी बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश क्रमाणी व मेहकर येथील नंदकिशोर मगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योजकतेलाही चालना देण्याचा सकारात्मक विचार व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांनी प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचीही भेट घेवून योजनांची पुस्तिका भेट दिली.

।योजना कोणत्या आहे ?

रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, कृषी उद्योग प्रशिक्षण योजना, ड्रोन ॲापरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण योजना, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण योजना आणि अमृत बेकरी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत.

औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी तांत्रिक रोजगार प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॅानिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण, व्यवसाय किंवा उद्योग इंक्युबेशन योजना, अमृत कलश योजना राबविल्या जात आहेत.स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्यासाठी युपीएससी स्पर्धा परीक्षा नागरी सेवा/ वन सेवा/ अभियांत्रिकी सेवा परिक्षार्थींना अर्थसहाय्य दिले जाते.तसेच एमपीएससी स्पर्धा परीक्षा गट अ,ब च्या परीक्षार्थींना अर्थसहाय्य दिले जाते.उद्योजकांकरिता आर्थिक विकास योजनेंतर्गत वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि परशुराम गट व्याज परतावा योजना राबविली जात आहे.

शैक्षणिक अर्थयहाय्य योजनेंतर्गत एम्स, आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य आणि शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य दिले जात आहेव्यक्तिमत्व विकासांतर्गत किशोर विकास उपक्रम व अमृत कलश योजना राबविली जात आहे.बुलढाण्यातील युवकयुवतींनी अमृत संस्थेच्या योजना व प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी जिग्नेश क्रमाणी यांना 8308998922 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत योजनेच्या या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील युवकयुवतींनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले आहे.

 मेदच्या माध्यमातून दिदी लखपतीस्वयं सहायता समूहातील महिलांची प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिलांसाठी शाश्वत उपजीविकेचे स्त्रोत निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यांना या माध्यमातून लखपती दिदी करण्यात येत आहे. उमेदच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील दुर्गम परळी खोऱ्यात पारंपारिक कुंभार व्यवसायातून लखपती दिदी झालेल्या अंजना शंकर कुंभार यांचा जीवनमान उंचावण्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, त्यांची ही यशोगाथा……अंजना यांचे लग्नापूर्वीचे आयुष्य पुणे येथे गेल्यामुळे पारंपारिक कुंभारकामाची कला त्यांच्याकडे नव्हती. दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या अंजना या सुरुवातीपासून जिद्दी आहेत. लग्नानंतर त्यांचे आयुष्य पूर्ण बदलले, पुण्यासारख्या शहरी वातावरणातून परळी सारख्या दुर्गम गावी त्या आल्या. सासरचे कुटुंब कुंभार व्यवसायावरच अवलंबून होते. दोन मुलांच्या जन्मानंतर अंजना यांना स्वतः देखील घरच्या व्यवसायात हातभार लावावा असे वाटू लागले. त्यातच गावामध्ये ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे वारे वाहत होते. अंजना यांच्या मनातल्या सुप्त इच्छेला ‘उमेद’ चे पंख मिळाले.

घरच्यांच्या साथीने आणि जिद्दीच्या जोरावर वयाच्या 32 व्या वर्षी खानापूर, बेळगाव येथे त्यांनी टेराकोटा आर्टचे प्रशिक्षण घेतले. अनुभव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पुढे त्या या कामात निपुण झाल्या. सुरुवातीला फक्त पणत्या, गणेशमूर्ती बनवण्यापर्यंत मर्यादित असलेला उद्योग आता आकर्षक भांडी, मातीच्या सजावटीच्या वस्तू, विविध मूर्ती, मातीचे दागिने इत्यादी बनवण्यापर्यंत विस्तारला आहे.

 व्यवसाय वाढीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून गटासाठी मिळालेल्या फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी, आणि बँकेकडून मिळालेले अर्थसाहाय्य यातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले. केंद्र शासनाच्या मुद्रा आणि विश्वकर्मा योजनेतून मिळालेल्या लाभामुळे त्यांच्या गावातील बचत गटात असणाऱ्या इतर महिलांना रोजगार देण्याइतपत त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढली आहे.

आज त्यांच्या व्यवसायात 6 कामगार मदतीला आहेत. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियानाच्या माध्यमातून विविध प्रदर्शने आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपला व्यवसायाची उलाढाल वाढवली आहे. आजमितीला त्यांची वार्षिक उलाढाल ही 15 लाखांच्या घरात गेली असून त्या स्वतः लखपती दीदी बनलेल्या आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती शंकर कुंभार, कुटुंबीय आणि ‘उमेद’ अभियानाची त्यांना भक्कम साथ मिळाली आहे.अंजना कुंभार म्हणतात, उमेदच्या सहकार्याने माझी आर्थिक उन्नती झाली आहे. उमेदच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ मिळाले आहे. बदलत्या कुंभार व्यवसायातून चांगली आर्थिक उलाढाल होत आहे. ‘माझे कुटुंब सुखी आणि समाधानी जगत आहे. महिलांनीही उमेदच्या माध्यमातून आपल्या पारपांरिक अथवा त्यांच्या आवडीच्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करावा आपले जीवनमान उंचावावे’, असे आवाहनही श्रीमती कुंभार करतात.

0000000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-सावधान….! भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

vishwatmaklokswamivarta

एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जनआरोग्य योजना उपचारांची संख्या वाढली; योजना अधिक व्यापक…

vishwatmaklokswamivarta

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta