vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. तुषार राठोड व श्रीजया चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, तत्कालीन अर्धापूर ग्रामपंचायतीने युनानी दवाखान्याच्या बांधकामासाठी काही जमीन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दानपत्राद्वारे हस्तांतरित केली होती. मात्र, या जागेवर एका व्यक्तीकडून अनधिकृतपणे अतिक्रमण करून घराचे बांधकाम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण सध्या जिल्हा न्यायालय, नांदेड येथे न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाच्या निर्णयानुसार त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*    *मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे होणार सातारा जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर*

रायगड जिल्हा सरासरी पाऊस (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०६.२०२५ (मिमीमध्ये)

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७९ वी बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न-जिल्हा बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही;वर्षभरात १५ लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे