vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न-जिल्हा बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न-जिल्हा बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

जालना, (प्रतिनिधी)-बँकेच्या बँकेची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा १४ सप्टेंबर रोजी बँकेच्या जालना येथील बँकेच्या सभागृहात बँकेचे अध्यक्ष सतिशराव टोपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. सभेत सर्वप्रथम बँकेचे अध्यक्ष सतिश टोपे यांनी जिल्हयातील उपस्थित सर्व मान्यवर, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,प्रतिनिधी यांचे स्वागत केले.सभेच्या कामकाजापुर्वी सभागृहात अहवाल वर्षातील दिवंगतांना श्रध्दांजलीअर्पण करण्यात आली. यानंतर वार्षीक सभेच्या कामकाजास सुरुवात होऊन बँकेचेकार्यकारी संचालक आशुतोष देशमुख यांनी विषय सुचीनुसार विषयांचे वाचन केले व सभागृहात उपस्थित सभासदांनी सदरील विषयांस टाळयांच्या गजरात सर्वानुमतेमंजुरी दिली. यानंतर मार्च २०२५ अखेर जिल्ह्यातील ज्या वि.का.से.संस्थांनी बँक कर्जाची १०० टक्के कर्ज वसुली केलेली आहे. अशा ५९ वि.का.से. संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व गटसचिव यांना वार्षीक सभेचे

मार्गदर्शक माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,बँकेचे जेष्ठ संचालक माजी आमदार अरविंद चव्हाण तसेच बँकेचे संचालकमंडळातील सदस्य यांचे हस्ते ‘गौरव प्रमाणपत्र’ देऊन संस्थेच्या कामकाजास गौरविण्यात आले.यानंतर बँकेचे अध्यक्ष सतिश टोपे यांनी बँकेच्या वार्षीक सभेचे प्रमुखपाहुणे व मार्गदर्शक माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटीलदानवे यांचे स्वागत केले. तसेच बँकेचे उपाध्यक्ष भिमराव जावळे यांनीबँकेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य पंचायत समितीचे अध्यक्ष विद्यमानआमदार संतोष दानवे यांचे स्वागत केले. बँकेचे अध्यक्ष सतिश टोपे यांनीअध्यक्षीय भाषणात अहवाल वर्षात बँकेच्या आर्थिक स्थितीमधील विविध बाबींतझालेल्या प्रगतीची माहिती सभागृहात सांगितली. बँकेने बँकेच्या सर्व खातेदारांना मिस कॉल मोबाईल क्रमांकाद्वारे खात्यावरील शिल्लक जमा रक्कमेचा तपशिल मिळविणेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच बँकेच्या सीबीएस नेटवर्क मध्ये सायबर सेक्युरिटी ऑपरेशन- सेंटरच्या सुरक्षात्मक वनियंत्रणात्मक बाबींची कार्य अंमलबजावणी करीत आहे.यामुळे बँकेच्या खातेदारांची बँके कडील खाती सायबर हल्ल्यापासुन ‘सायबरसुरक्षित ‘ आहेत, तसेच बँकेच्या सर्व शाखांच्या राऊटरमध्ये ‘फायरवॉल’ यासुरक्षात्मक उपकरणाद्वारे बँकेच्या सीबीएस नेटवर्क मध्ये ‘ बँकेचेव्यवहार करणेचे अधिकार असलेले बॅकेचे अधिकृत कर्मचारी, अधिकारी, बँकिंगसॉफ्टवेअर, नेटवर्क तंत्रज्ञ यांच्या व्यतिरिक्त इतर, अनोळखी, ओपनइंटरनेट ई. यांना पुर्णतः शिरकाव प्रतिबंधीत केलेला आहे, अशी सभेस माहिती देऊन बँकेच्या आर्थिक प्रगती बाबतची सभेस माहिती दिली.यात बँकेस सन २०२५ अखेर ढोबळ नफा रु.१७.१५ कोटी झालेला असून निव्वळ नफारु.८.६७ कोटी झालेला आहे. बँकेस गत १० वर्षापासून सतत ‘ब’ ऑडीट वर्गप्राप्त करीत आहे, तर नाबार्ड तपासणीमध्ये सन २०१९ पासून ‘ब+’ वर्ग प्राप्त होत आहे.बँकेस सी.आर.ए.आर. चे प्रमाण ९ टक्के आवश्यक आहे. तर सन२०२५ मध्ये १९.९७ टक्के हे प्रमाणराखलेले आहे. बँकेचे नेटवर्थ सन २०२४मध्ये रु.६२.१८ कोटी होते. यामध्ये रु.२१.४४ कोटीने वाढ होऊन सन २०२५अखेर रु.८३.६२ कोटी झाले आहे. सन २०२४ मध्ये बँकेचा संचित तोटा रु.६.६०कोटी होता, तर सन २०२५ अखेर संचित तोटा ‘निरंक’ होऊन बँकेस निव्वळ नफा रु.२.०७ कोटी झालेला आहे.

बँकेच्या ठेवी सन २०२४ मध्ये रु.५१६.३५ कोटी होत्या तर सन २०२५ अखेररु.७२.१३ कोटीने वाढ होऊन बँकेच्या एकुण ठेवी रु.५८८.४८ कोटी पर्यंतवाढलेल्या आहेत. बँकेची वसुली सन २०२५ अखेर रु.४०.०० टक्के आहे. सन २०२४मध्ये बँकेची गुंतवणुक रु.२२९.९६ कोटी होती. तर सन २०२५ अखेर रु.३०५.०८कोटी आहे. बँकेच्या गुंतवणुकी मध्ये रु.७५.१२ कोटीने वाढ झालेली आहे.बँकेस प्रâंटीयर को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन या देश पातळीवरीलसंस्थेमार्फत बँकेस सलग ६ वर्षापासून अ‍ॅवार्ड (पारितोषीके) प्राप्त होतआहे. सन २०२५ मध्ये बँकेस नुकतेच ‘लिडरशिप अवार्ड- हेड ऑफद आय.टी.’ व ‘

i: बेस्ट पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन ‘ या क्षेत्र मध्ये बॅकेच्य उल्लेखनिय कामगिरी बद्यल बॅकेची अवॉर्ड (पारितोषका) साठी निवड झालेली आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे बँक सलग ५ वर्षापासून नियमित कर्जपरतफेड करणार्‍या शेतकरी सभासदास १०ज्ञ् वाढीव कर्ज वितरण करीत आहे.बँकेच्या खातेदारांना त्यांच्या बचत खात्यातील जमा शिल्लक रक्कमेचा तपशिलत्वरीत मिळण्यासाठी मिस कॉल सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. बँकेनेसीबीएस नेटवर्क मध्ये(सी-सॉक) सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरद्वारेबँकेच्या ग्राहकांना सायबर सुरक्षा सेवा पुरवित आहे. बँकेकडे गत ३५वर्षापासुन संचित असलेला तोटा बँकेने मार्च २०२५ अखेर निरंक केलेला आहे.तसेच सन २०२५-२६ करीता बँकेकडे रु. २.०७ कोटी नफा शिल्ल आहे. गत प्रदिर्घकाळानंतर बँक निव्वळ नफयात आली आहे. बँकेचे विद्यमान संचालक मंडळांनेवेळोवेळी घेतलेले सकारात्मक निर्णस व सन २०१० पासुन कै. अंकुशराव टोपेसाहेब यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व खर्चात काटकसर तसेचबँकेच्या उत्पन्नात भरीव वाढ करुन बॅक निव्वळ नफयात आणली आहे व यापुढेबॅक सतत नफ्यात राहील, यासाठी बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे, अशीसभेस माहिती देऊन बँकेचे ग्राहक, खातेदार व ठेवीदार यांच्यासाठीबँकेमार्फत अंमलात आणल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची सभेस माहितीदिली.बँकेने शेतकरी जनता अपघात विमा :- बँकेने सन २०२४ मध्ये जिल्हयातीलचालुबाकी कर्जदार शेतकर्‍यांसाठी नाममात्र विमा हप्त्यात एक वर्षकालावधीसाठी रु.२.०० लाखांचा अपघाती विमा कंपनी मार्फत उपलब्ध करुनदिलेला आहे. सन २०२५-२६ च्या हंगामात बँकेने या योजनेत जिल्हयातील जवळपास४७,९६५ नियमित कर्ज परतफेड करणार्‍या चालुबाकी कर्जदार शेतकरी सभासदांचाविमा उतरविण्यात आलेला आहे. बँकेने शेतकर्‍यांना अपघाती विमा संरक्षणउपलब्ध करुन दिले आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना :- महाराष्ट्रशासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण ‘ योजने अंतर्गत जिल्हयातील शहरी,ग्रामिण भागातील महिलांचे बचत खाते शुन्य बॅलन्स मध्ये उघडण्याचा निर्णयसर्वप्रथम जालना बँकेच्या संचालक मंडळाने घेऊन तशी सुविधा जिल्हयातीलमहिला भगिनींना सर्व शाखां मध्ये उपलब्ध करुन दिलेली आहे. यांस महिलाभगिनीं मार्फत मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजने अंतर्गत बँकेच्या ६३,५०८लाभार्थी महिला खातेदारांच्या खाती रक्कम जमा करण्यात आली आहे.बॅकेत ए.बी.बी. (एनी बँच बँकिंग) सुविधेस गतीमान करण्यात आलेः- बँकेचेखातेदार आता आपल्या मुळ शाखेतील खात्यावर बँकेच्या ६४ शाखांपैकीकोणत्याही शाखेतुन रक्कमेचा भरणा अथवा रक्कम काढण्याचा कोणताही व्यवहारकरु शकतात. तसेच सर्व शाखां मधुन आर.टी.जी.एस./ एन.ई.एफ.टी. ची सुविधाउपलब्ध करुन देण्यात आली आहे. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यावरीलनांवे अथवा जमा रक्कमेच्या व्यवहाराचा तपशिल त्यांच्या मोबाईलवरएस.एम.एस.द्वारे दिला जात आहे. बैंक खातेदारांना त्यांच्या रक्कमा इतरबँकांतील खातेदारांना पाठविणेसाठी शाखास्तरावर ‘ आय.एम.पी.एस.’ (ईमिजियटमोबाईल पेमेंट सिस्टीम) बँच ट्रान्झक्शन सुविधा उपलब्ध करुन देतआहे.बँकेचा खातेदार त्याच्या मागणीनुसार बँकेच्या शाखेद्वारे इतर बँकांचेखातेदार यांच्या खात्यात रक्कमा वर्ग करणेसाठी बँक सीबीएस सिस्टीम मध्ये’आय.एम.पी.एस. ‘ बँच ट्रान्इक्शन सुविधा बॅकेच्या सर्व शाखास्तरावरउपलब्ध करुन देत आहे, ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना त्यांच्या रक्कमापाठविणेसाठी ‘आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी.’ साठी इतर व राष्ट्रीयकृत बँकांतजाण्याची गरज राहणार नाही. बँकेच्या शाखास्तरावरुन खातेदाराच्या मागणीनुसार त्यांच्या रक्कमा इतर बँकांतील खातेदारांना सरळ जमा करण्यात येतील.बँकेतील प्रत्येक खातेदाराच्या बँकेतील रु.५.०० लाखा पर्यतच्या कोणत्याहीप्रकारच्या ठेवी विमा संरक्षणाद्वारे सुरक्षित :- बॅकेतील खातेदारांच्यासर्वप्रकारच्या ठेवीचा रु.५.०० लाखा पर्यतच्या ठेव रक्कमेचा बँके मार्फतविमा काढण्यात आला आहे. यापोटी बँक ही विमा कंपनीस रु.७०.०० लाख विमाहप्ता विमा कंपनीस भरणा करीत आहे. सदरील ठेव विमा संरक्षणामुळे बँकेकडीलठेव रक्कमे बाबत बँकेचे ठेवीदार आश्वस्त असुन त्यांची ठेव रक्कम विम्याने: सुरक्षित आहे.बॅकेचा गत ३४ वर्षा पासुनचा सततचा संचित असलेला तोटा मार्च२०२५ अखेर निरंक झाला आहे.:- बँकेस सन १९९१ पासुन म्हणजे जवळपास गत ३५वर्षापासुन बँकेकडे सततचा संचित असलेला तोटा बॅक मार्च २०२५ अखेर संपुर्णनिरंक केलेला आहे. सन २०२५-२६ साठी रु.०२.०७कोटी नफा शिल्लक आहे. तसेचयापुढे यापुढील कालावधीत बॅक कायम नफयात राहील किंबहुना नफ्यात विक्रमीवाढ करील, असे प्रयत्न बँकेच्या संचालक मंडळाद्वारे करण्यात येत आहेत.बकेने कोअर बँकीग सोल्युशन (सीबीएस) संगणकीय प्रणालीद्वारे ग्राहकांनाअनेकविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेस ठेवी, अनुदान, कर्ज अथवाईतर मार्गाने मिळणारा निधी बॅक जिल्हयातील शेतकरी सभासदांच्या आर्थिकगरजा पुर्ण करणे व जिल्हयाच्या सर्वांगिण विकासा साठी उपयोगात आणीत आहे.करीता जिल्हयातील ठेवीदार, खातेदार व कर्जदार सभासदांनी आपले सर्वप्रकारचे व्यवहार जिल्हा बँकेमार्फत करुन आपल्या ठेवी जिल्हा बँकेतचठेवाव्यात, आपल्या कडील कर्जाची नियमित परतफेड करुन व्याज परतावा सवलतीचालाभ घेणे, खातेदाराची केवायसी पुर्तता, कर्जदारांची अपुर्ण भागधारणेचीपुर्तता करणे क्रमप्राप्त आहे. करीता सर्व सभासद बंधूनी बँकेस सहकार्यकरावे, अशी विनंती बँकेचे अध्यक्षांनी उपस्थित सर्व सदस्यांना केली आहे.बँकेच्या ४२ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेस माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मार्गदर्शन करतांना बँकेच्याआर्थिक प्रगती बाबत सांगतांना बँक ही मोठ्या आर्थिक अडचणीच्या काळातुनवाटचाल करीत बँक स्वंयपुर्ण होत असल्या बाबत समाधान व्यक्त करुन तसेचसहकारी संस्थांनी बँकेच्या कर्जवसुलीस प्राधान्य देऊन वाढ करावी तरच बॅकदेखील संस्थांना कर्जवाटपात वाढ देऊ शकेल याबाबतचे सभेत अवाहन केले आहे.

तसेच जिल्हयातील सहकारी संस्था, सधन शेतकरी, व्यापारी व सर्व सामान्यशेतकर्‍यांनी बँकेकडे आपल्या ठेवी ठेऊन बँकेच्या प्रगतीमधुन जिल्हयातीलशेती व्यवसाय, शेतकर्‍यांचा विकास साधावा, असेही त्यांनी सभेत सांगितलेआहे. तसेच केंद्र शासन देशातील सहकारी संस्थांना आर्थिक बळकटी देणेसाठीअंमलात आणीत असलेल्या विविध योजनांची त्यांनी सभेत माहिती दिली, व प्रथमविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी आपली आर्थिक परिस्थिती सुदृढकरावी, असे सहकारी संस्थांना अवाहन केले आहे.बँकेचे कार्यकारी संचालक आशुतोष देशमुख यांनी बँकेच्या वार्षीकसर्वसाधारण सभेस उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानुन बँकेचे अध्यक्ष यांचेपरवानगीने सदरील सभा संपल्याचे जाहिर केले. बॅकेच्या वार्षीक सर्वसाधारणसभेस बँकेचे उपाध्यक्ष भिमराव जावळे, तसेच संचालक मंडळाचे सदस्य विद्यमानआमदार तथा महाराष्ट्र राज्याचे पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष संतोषरावदानवे, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, माजी आ. कैलाश गोरंट्याल, माजी आ.शिवाजीराव चोथे,शालिकग्राम म्हस्के, भाऊसाहेब जाधव, रितेश कामड, स. जहीरस.नजीर, शितल कुचे,मनिषा उढाण, निर्मला मरकड, सुनिता खरात हे उपस्थितहोते. तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना,सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था, जालना हे सभेस उपस्थित होते.बँकेचे कार्यकारी संचालक आशुतोष देशमुख, सरव्यवस्थापक सुरेश जाधव,व्यवस्थापक दादाराव राऊत व बँकेचे अधिकारी व कर्मचारी सभेस उपस्थित होते.सभेचे स्वागत व सुत्रसंचालन बँकेचे सरव्यवस्थापक सुरेश जाधव यांनी केले.तसेच बँकेचे माजी अध्यक्ष मनोज मरकड,माजी संचालक अशोक लोंढे, रावसाहेबदाभाडे, प्रदिपराव मरकड, सिध्दीविनायक मुळे,शकुंतलाताई कदम, यांचीप्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच समर्थ सहकारी साखर कारखान्याचेउपाध्यक्ष उत्तम पवार, जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेशचव्हाण,अच्युतराव कदम, राजेश कोल्हे, राम सावंत, अच्युतराव कदम,दत्तात्र्य तौर, शरदराव टोपे,अरुणराव कळकटे, प्रभाकर इंगळे, युवा सेनेचेअभिमन्यु खोतकर, तात्यासाहेब चिमणे,बालासाहेब शिंदे, बद्रीभाऊ पठाडे,सतिशराव होंडे,रमेश पैठणे, नानाभाऊ उगले, तसेच समर्थ सहकारी बँकेचेमहाव्यवस्थापक विजय कनुजे यांची सभेस उपस्थिती होती. एकंदरीत आज १४सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची ४२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात वखेळीमेळीच्या वातावरणात संपन झाली.

संबंधित पोस्ट

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

vishwatmaklokswamivarta

शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी, लावण्यासाठी सस्ती अदालत उपक्रम राबविणार- विभागीय आयुक्त दिलीप गावडे*“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्तांचा थेट शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद**शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत आठही जिल्हयातील शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी*Ø *तालुका पातळीवर दर पंधरवाड्याला सस्ती अदालत घेण्याचे निर्देश *

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम जनजातीय गौरव दिवसनिमित्त तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..