vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

            सांगली, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 6 मे 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 करिता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षण दिनांक 18 जून 2025 पासून सुरू करण्यात आले आहे. नागरिक सर्वेक्षणाचा कालावधी 18 जून ते 17 जुलै 2025 असा आाहे. विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यात नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग घ्यावा, असे आवाहन शासनाच्या नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे.

            विकसित भारतच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र 2047 साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात 7 सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. सर्वेक्षणात सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्यांच्या समस्या, शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन, त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विकसित महाराष्ट्र 2047 करिता नागरिक https://wa.link/o93s9m या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

लोकांनी आपले हक्क स्वतःहून राबवून घ्यावेत – न्यायमूर्ती रोहित वासुदेव जोशी**देसाईगंज येथे विधीसेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात*

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका;वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच! वकीलांसाठी इंग्रजाळलेला काळा ड्रेसकोड चालतो, तर मंदिरातील ड्रेसकोडविषयी आक्षेप का ? – ‘रणरागिणी’चा सवाल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार