vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पलूस नवोदय विद्यालयात प्रवेश अर्जासाठी 29 जुलैची मुदत..

पलूस नवोदय विद्यालयात प्रवेश अर्जासाठी 29 जुलैची मुदत..

            सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातून जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश 2026 प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे 80 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 29 जुलै 2025 पर्यंत आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मुदतीमध्ये भरावेत, असे आवाहन प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

   ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.navodaya.gov.in/https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. पात्र उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असावा. ऑनलाईन अर्ज करताना ते इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून योग्यरित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वतःचे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाकडून प्रतिहस्ताक्षरित केलेले प्रमाणपत्र (jpg स्वरुपात 10kb-100kb प्रमाणात) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्यांचा जन्म हा 01 मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान झालेला असावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती १ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच पाटण्यात

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta