vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चित्रपट निर्माता – निर्देशक प्रकाश मेहरा यांना अभिवादन…!

 चित्रपट निर्माता – निर्देशक प्रकाश मेहरा यांना अभिवादन…!

जालना- प्रतिनिधी

हिंदी चित्रपत्र सृष्टीतील प्रख्यात अष्टपैलू व्यक्तीमत्व, ज्येष्ठ निर्माता – निर्देशक, लेखक, गीतकार श्री प्रकाश मेहरा यांच्या 86 व्या जयंती निमित्त त्यांच्या रसीकप्रेमी चाहत्यांच्यावतीने मेहरांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

दि. 13-07-1939 रोजी उत्तर प्रदेशातील बिजनोर ह्या गावी जन्मलेल्या मेहरांचे बालपण अत्यंत खडतर होते. वयाच्या पाचव्या वर्षी आईचे छत्र हरवले, पित्याचे प्रेम देखील त्यांना मिळाले नाही. खिशात 13 रुपये असतांना आपले भाग्य आजमवण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. चंदेरी दुनियेत त्यांचा कोणताही वारसा वशीला नसल्याने फुटपाथ, रेल्वे स्टेशनवर रात्र काढीत चने फुटाणे खात अत्यंत हलाखीचे जीवन जगत त्यांनी जिवनाशी संघर्ष केल्यानंतर 1960 मध्ये प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणुन त्यांनी कारकींदीस आरंभ केला. ‘हसीना मान जायेंगी, हाथ की सफाई, मेला, समाधी’ ह्या सुपरहीट चित्रपटांचे दिग्दर्शन मेहरांनीच केले. त्यांना मिळालेल्या यशानंतर त्यांनी मागे वळुन न पाहता आपली घौडदौड कायम ठेऊन 1973 नंतर ‘जंजीर, खुनपसीना, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारीस, घुंगरु, ज्वालमुखी’ ह्या बॉक्स ऑफीसवर गोल्डन डायमंड ज्युबीली व्यवसाय केलेल्या चित्रपटांचे मेहरा निर्माता-निर्देशक होते

मेहरांचे ऊर्दु भाषेवर प्रभुत्व होते. तसेच त्यांना गीत लेखनाची देखील आवड होती. सलामे-इश्क (मुकद्दर का सिकंदर), अपनी तो जैसे तैसे (लावारीस), पग घुंगरू बांध (नमक हलाल), मंजीले अपनी जगह (शराबी), और इस दिल में (इमानदार) हे त्यांन लिहिलेली गाणी फिल्मी रसीकांना खुप आवडल्याने आजपर्यंत ही गाणी लोकप्रिय आहे.

उपस्थित कलाकारांनी गीत प्रस्तुत करून आपल्या भावना व्यक्त केल्या प्रारंभी चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रस्तावना मानली व कार्यक्रमात सुरुवात केली संगीत विरासत श्री संजय शहाणे काशिनाथ बेनिवाल गायक शिवकुमार ठाकूर भास्कर खरात मोहम्मद सलीम अशोक मिश्रा राजा चंद्रकांत कुलकर्णी बाळू सोनार शशिकांत कुलकर्णी श्रीनिवास पांगरकर रवी कोल्हे राजू लोहाटे रामेश्वर मिसाळ यशवंत होते कलीम भाई कार्यक्रमाच्या शेवटी राधेश्याम जयस्वाल यांनी उपस्थितांचे आभार मानले छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे *भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच दाखले देण्यात यश

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta