vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी 21 जुलैपर्यंत मुदत..

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी 21 जुलैपर्यंत मुदत..

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (सन 1962 चा अधिनियम 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या क्रमांक/जिकाठा/सा.शा/जि.प.पं.स.नि-2025/प्रभाग रचना कार्य 2025, दि.14 जुलै 2025, च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच कल्याण / भिवंडी / शहापूर / मुरबाड / अंबरनाथ तहसिलदार आणि पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

    हा मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दि.14 जुलै 2025 नंतर विचारात घेण्यात येईल, आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने / हरकती / सूचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि.21 जुलै 2025 पर्यंत सादर कराव्यात.या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने / हरकती / सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्त १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान..

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७(१) व (३) आदेश जारी