vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

रायगड( प्रतिनिधी:- राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया व मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्याकरिता प्रवासी कंपनीची निवड करावयाची आहे. या योजनेंतर्गत GeMपोर्टलवर दि. 14 जुलै, 2025 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेंतर्गत दि. 18 जुलै, 2025 रोजी निविदापूर्व सभा राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 25 जुलै, 2025 रोजी दु.12.00 वाजेपर्यंत आहे. GeM पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या देशनिहाय निविदांचे क्रमांक पुढीलप्रमाणे :- दौरा-1 युरोप, दौऱ्याचे एकूण दिवस 12 दिवस, निविदा क्रमांक- GEM/2025/B/6443685. दौरा-2 इस्राईल, दौऱ्याचे एकूण दिवस 09 दिवस, निविदा क्रमांक- GEM/2025/B/6443752. दौरा-3 जपान, दौऱ्याचे एकूण दिवस 10 दिवस, निविदा क्रमांक- GEM/2025/B/6443819. दौरा 4 मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स, दौऱ्याचे एकूण दिवस 12 दिवस, निविदा क्रमांक GEM/2025/B/6443399. दौरा 5 चीन, दौऱ्याचे एकूण दिवस 08 दिवस, निविदा क्रमांक GEM/2025/B/6443459. दौरा 6 दक्षिण कोरिया, दौऱ्याचे एकूण दिवस 10 दिवस, निविदा क्रमांक GEM/2025/B/6443596.

000000

संबंधित पोस्ट

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा-संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारी रोजी; २०६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात